महाभुलेख भूमि अभिलेख या पोर्टलवर गाव नमुना नंबर ७/१२, ८अ, मालमत्ता पत्रक व जमीन मोजणी नकाशाची क-प्रत माहितीस्तव आपण बघू शकतो.
योजनेचे नाव: | महा भूलेख महाभूमि, Maha bhumi abhilekh, Bhulekh Maharashtra |
कोणा द्वारे सुरु झाली: | भूमी अभिलेख महसूल विभाग |
हितकारक: | महाराष्ट्राचे नागरिक, भूधारक, जमिनीचे मालक व इतर |
योजनेचा उद्देश: | भूमि अभिलेख जमिनी संबंधित माहिती प्राप्त करणे |
भूमि अभिलेख वेबसाइट लिंक: | bhulekh.mahabhumi.gov.in |

Mahabhulekh v2.0 महा भुमी अभिलेख
MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh) – महाराष्ट्र राज्याची एक भूमी अभिलेख वेबसाइट जी नागरिकांना ७/१२ उतारा, ८अ उतारा, मालमत्ता कार्ड आणि जमीन मोजणी नकाशाची क-प्रत ऑनलाइन प्रदान करते.
सातबारा उतारा कसा बघावा?
सर्वप्रथम भूमि अभिलेख महाभुलेख वेबसाईट- bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
जर आपल्याजवळ अकरा अंकी मालमत्ता यूआयडी क्रमांक (Property UID Number) असेल तर आपण खालील पद्धतीने सातबारा बघू शकतो.

- अकरा अंकी प्रॉपर्टी यूआयडी क्रमांक योग्य पद्धतीने टाईप करा.
- मोबाईल क्रमांक लिहा.
- भाषा निवडा.
- सांकेतिक क्रमांक(Captcha) योग्य पद्धतीने टाईप करा.
- आपल्याला हवा असलेला सातबारा आपल्यासमोर आहे.
जर आपल्याजवळ प्रॉपर्टी यूआयडी क्रमांक नसेल तर खालील पद्धतीने सातबारा बघा अथवा मिळवा.

- अधिकार अभिलेखाचा प्रकार (Record of Right) 7/12 सलेक्ट करा.
- जिल्हा निवडा. (उदाहरणार्थ- ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा पुणे, नाशिक, जळगाव, नागपूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, रत्नागिरी)
- तालुका गाव सिलेक्ट करा.
- सर्वे नंबर/ गट नंबर(Survey/Gat Number) किंवा नाव यापैकी एक सिलेक्ट करा.
- सर्वे नंबर/ गट नंबर नंतर मोबाईल क्रमांक, भाषा निवडा.
- सांकेतिक क्रमांक(Captcha) तंतोतंत बरोबर लिहा कॅपिटल व स्मॉल लेटर व्यवस्थित बघा व लिहा.
- सबमिट बटन दाबल्याबरोबर सातबारा उतारा आपल्या समोर आहे.

जमिनीचा 8अ उतारा ऑनलाइन कसा बघावा?
- आठ अ उतारा पाहण्यासाठी सर्वप्रथम भूमि अभिलेख महाभुलेख वेबसाईट- bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
- अधिकार अभिलेखाचा प्रकार (Record of Right) 8अ सलेक्ट करा.
- जिल्हा(District),तालुका(Taluka), गाव(Village) निवडा.
- खाते क्रमांक(Khata Number) किंवा नाव(Name) सिलेक्ट करा निवडा.
- खाते क्रमांक(Khata Number) नाव शोधा व त्यानंतर मोबाईल क्रमांक लिहा.
- भाषा सिलेक्ट करा व सांकेतिक क्रमांक(Captcha) टाईप करा.
- जमिनीचा आठ अ उतारा आपल्यासमोर आहे.
मालमत्ता पत्रक ऑनलाईन कसे बघावे?
- मालमत्ता पत्रक(Property Card) पाहण्यासाठी सर्वप्रथम भूमि अभिलेख महाभुलेख वेबसाईट- bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
- अधिकार अभिलेखाचा प्रकार (Record of Right) मालमत्ता पत्रक(Property Card) सलेक्ट करा.
- मालमत्ता पत्रकासाठी जिल्हा(District),तालुका(Taluka), गाव(Village) निवडा.
- न.भु.क्र.(CTS Number) किंवा नाव(Name) सिलेक्ट करा.
- न.भु.क्र.(CTS Number) किंवा नाव(Name) शोधा व मोबाईल क्रमांक लिहा.
- भाषा निवडा व सांकेतिक क्रमांक तंतोतंत बरोबर लिहा.
- सबमिट बटन दाबल्यावर मालमत्ता पत्रक आपल्यासमोर आहे.
मोजणी नकाशाची क-प्रत(K-Prat) ऑनलाईन कशी बघावी?
- मोजणी नकाशाची क-प्रत(K-Prat) पाहण्यासाठी प्रथम भूमी अभिलेख महाभुलेख वेबसाईट bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
- अधिकार अभिलेखाचा प्रकार (Record of Right) क-प्रत(K-Prat) सलेक्ट करा.
- भू नकाशाची क-प्रत(K-Prat) साठी जिल्हा(District),तालुका(Taluka), गाव(Village) निवडा.
- संकलन(Category) साठी नागरी भूमापन किंवा भूमापन पर्याय निवडा.
- जमीन मोजणीचा प्रकार(Purpose)- हद्द कायम, पोटहिस्ता, बिगर शेती, भूसंपादन, गुंठेवारी, कोर्टवाटप, कोर्ट कमिशन, जमीन प्रदान, शासकीय यापैकी एक पर्याय निवडा.
- जमीन मोजणीचा कालावधी प्रकार(Priority) सिलेक्ट करा- नियमित, तातडी, अतितातडी, अतिअतितातडी यापैकी हवा असलेला निवडा.
- भू नकाशा मोजणी रजिस्टर (मो.र.) क्रमांक(Registration No.) लिहा.
- अधिकार अभिलेख क-प्रत माहिती (K-Prat Details) पाहण्यासाठी मोबाईल नंबर लिहा भाषा निवडा.
- सांकेतिक क्रमांक(Captcha) तंतोतंत योग्य टाईप करा.
- सर्च बटणावर क्लिक करा.
- मोजणी नकाशाची क प्रत आपल्यासमोर आहे.
Faqs:
1. प्रथम भूमि अभिलेख महाभुलेख वेबसाईट- bhulekh.mahabhumi.gov.in ओपन करा.
2. अकरा अंकी प्रॉपर्टी यूआयडी क्रमांक योग्य पद्धतीने टाईप करा.
3. मोबाईल(Mobile) क्रमांक लिहा.
4. भाषा निवडा.
5. सांकेतिक क्रमांक(Captcha) योग्य पद्धतीने टाईप करा.
6. सातबारा उतारा ७/१२ आपल्यासमोर आहे.